हडपसर / प्रतिनिधी (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
बोपदेव घाटात तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले. मित्रांकडून चुकून पिस्तुलातून तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
बोपदेव घाटात तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले. मित्रांकडून चुकून पिस्तुलातून तरुणावर गोळी झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
गणेश नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश सुभाष भिलारे (२४), रोहन राजेंद्र गायकवाड (वय २३), अक्षय संदीप गंगावणे (२१) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. गणेश मुळे आणि आरोपी मित्र आहेत. रविवारी गणेश घरातून बेपत्ता झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत देशी बनावटीच्या पिस्तुलातून चुकून उडालेली गोळी मुळेच्या शरीरात शिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे मित्रांनी सांगितले. त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिल्याची माहिती मित्रांनी दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,उपनिरीक्षक चैत्राली गपाट, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, राहुल ढमढेरे, रमेश साबळे, अमित कांबळे आदींनी ही कारवाई केली.