हवेलीचे भूमी अभिलेख उप-अधीक्षकास धमकावने पडले महागात
प्रतिनिधी स्वप्नील कदम
लोणी काळभोर – तुम्हाला जास्त माज आलेला दिसतोय, मी तुमचा माज लगेच उतरवु शकतो. अशी धमकी देत कर्तव्यावर असलेल्या हवेली भुमी अभिलेख उप अधिक्षकाच्या कामात हस्तक्षेप करून हुज्जत घातली.सरकारी कामात अडथळा आणला व दमदाटी करत अरेरावी केल्याप्रकरणी थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनाथ काकडे याच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे.
याप्रकरणी हवेलीचे भुमी अभिलेख उपअधिक्षक शिवप्रसाद जिवनराव गौरकर (वय ४४, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर हे हवेली भुमी अभिलेख उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हवेली तालुक्यातील सर्व शहरी व निम शहरी भागातील कार्यालयामार्फत सर्व भुमी धारकांचे हद्दी कायम करून नकाशा देणे तसेच सिटी सर्वेचे कामकाज व नागरिकांना त्याच्या मागणीनुसार त्यांच्या मालकीचे जमीनीचे अभिलेख पुरवणे इ. कामे केल जातात.याप्रकरणी थेऊर (ता. हवेली) येथील ओंकार चंद्रकांत कुंजीर यांनी मोजणी अर्ज केला होता. त्यानुसार ११ मार्च ला मोजणी नियोजित करण्यात आली होती. सदर प्रकरणात काकडे अर्जदार नसताना देखील काकडे यांनी भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली. भेटीदरम्यान काकडे यांनी सदर प्रकरणात मार्च महिन्यातच मोजणी करून दयावे असे सांगितले त्यावेळी उपअधिक्षक गीरकर यांनी काकडे यांना नियोजित वेळी मोजणी करुन देवू असे सांगितले होते.
सोशल मिडीयावर बदनामी करण्याची धमकी…!
गुरुवारी (ता. ०९) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नवनाथ काकडे व त्यांचा आणखी एक साथीदार कार्यालयात येऊन थेऊर येथील हद्दीसंबंधी तातडीने बोलायचे आहे असे म्हणाले, त्यावेळेस उपअधिक्षक गौरकर म्हणाले सध्या लक्षवेधीचे कामकाज सुरु आहे. सध्या तुमच्याशी बोलु शकणार नाही, तुम्ही उद्या या आपण सविस्तर बोलू असे सांगतिले. याचा राग मनात धरून काकडे यांनी टेबलजवळ येवुन मोठयाने आरडा ओरड करत हुज्जत घालायला सुरुवात केली. व म्हणाले कि तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे, तुम्हि कोणाशी बोलत आहात, मी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेया अध्यक्ष आहे. मी वारवार भेट घेवुन देखील माझे काम तुम्ही करून देत नाहीत तुम्हाला जास्त माज आलेला दिसतोय, मी तुमचा माज लगेच उतरवु शकतो. मी तुमची सोशल मिडीयावर बदनामी करेल, तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करेल, अशी धमकी दिली.
उपअधिक्षक गौरकर हे त्यांना मोजणीची प्रक्रिया प्रक्रिया समजावुन सांगत होते तसेच कार्यालाकडे आंबेगाव तालुक्यातील अधिकची ३२५ प्रकरणे मोजणी कामी फेब्रवारी व मार्च महिन्यात नियोजीत असल्याने त्याचे प्रकरण २१ मार्च नंतर करुन देण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितले. यावेळी “आम्ही काय उपटायला आलोय का. तुम्हाला सांगतोय लगेच करा तर तुम्ही नाही म्हणताय, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, तुम्हाला भविष्यात याचा त्रास होईल, तुम्हाला बघुन घेतो” अशा धमक्या उपअधिक्षक गौरकर यांना दिल्या. यावेळी कार्यालयातील इतर भूकरमापक उपस्थित होते.
दरम्यान, काकडे याचा सदर प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना हुज्जत घालुन शासकिय कामात अडथळा आणला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील हे करीत आहेत.