Uncategorizedपुणे

किरीट सोमय्या पुणे मनपा पायरी प्रकरणात चार जणांना न्यायालयीन कोठडी

किरीट सोमय्या पुणे मनपा पायरी केसमधे प्रकरणी नव्याने 353 कलमानुसार गुन्हा दाखल

मागील वर्षी 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महानगरपालिकेत झालेल्या आंदोलनामधे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल होउन मेहरबान कोर्टाने जामिनावर सोडले आहे. तरीपण किरीट सोमय्या यांनी स्वतःच्या मानसिक समाधानासाठी सत्तेचा गैरवापर करून पोलिसांवर तीन महिन्यांपासून राजकीय दबाव टाकून आणखी 15 ते 20 शिवसैनिकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा केला. शिंदे-फडणवीस सरकारने किरीट सोमय्याचा फाजिल हट्ट पुरवून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 8 पदाधिकाऱ्यांवर वाढीव कलम टाकून, भादंवि कलम 353 नुसार (शासकीय कामात अडथळा) गुन्हा दाखल करण्यात आला. आठ पैकी चार जणांना अनिल दामजी, राजेश मोरे, संजय गवळी, अक्षय माळकर यांना 41 अ प्रमाणे नोटीस दिल्यामुळे या चौघांचा अटकपूर्व जामीन कोर्टात मंजूर करण्यात आला. परंतू इतर निलेश राउत, विकी धोत्रे, अजिंक्य पांगारे, बाळासाहेब गरुड या चार जणांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आज पहाटे अटक करून कोर्टासमोर हजर केले असता, मेहरबान मुदलियार कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अॅड मनोज माने, अॅड जगदिश मुळीक यांनी जामिनासाठी अर्ज केला असता, कोर्टाने जामिनावरील सुनावणी उद्या शनिवार दि 29 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान या चौघांचा जामीन मंजूर होईपर्यंत येरवडा जेल येथे रवानगी करण्यात आली आहे.