पुणेहडपसर

योगसाधना काळाची गरज : प्राचार्य दत्तात्रय जाधव.

हडपसर,वार्ताहर.

     योग हा भारतात फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय ऋषी पतंजली यांनी लिहिलेला ‘योगसूत्र’ नावाचा ग्रंथ जवळपास 2000 वर्षे जुना आहे.योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग म्हणजे बुद्धी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन होय. योग म्हणजे आत्म्याचे स्थिरत्व होय. योग म्हणजे मनुष्याचे त्याच्या आत्मशक्तीशी मीलन होय.शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी योगसाधना काळाची गरज आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.

 

साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर येथे आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.प्रतिमापूजनानंतर विद्यालयातील शिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी योगगीत सादर केले. यानंतर पतंजली योग समितीच्या वतीने योगगुरू सोमनाथ अडसुळे व अशोक अडसुळे यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व सांगून ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन,उत्तानासन, अर्धचक्रासन ,त्रिकोणासन,भद्रासन, बद्धकोनासन ,शशांकासन,अर्धउष्ट्रासन,भुजंगासन ,शलभासन,मकरासन, सेतूबंधासन,प्राणायाम व कपालभाती इ. योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यालयातील जवळपास 6500 विद्यार्थ्यांनी व 250 शिक्षकांनी सहभाग घेतला.

 

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम
पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर ,धनाजी सावंत, क्रीडाशिक्षक रमेश महाडिक,कोंडिबा टेंगले,गणेश निचळे, सचिन धोदाड,सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका माधूरी राऊत यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.तर आभार मंगेश ढोणे यांनी मानले.