पुणे

आठ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद, एकूण ११ गुन्हे उघडकीस, गून्हे शाखा युनिट,६ ची दमदार कामगिरी

  प्रतिनिधी -स्वप्नील कदम 

वाघोली: चोरीच्या अकरा गुन्ह्यात आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद करून अकरा गुन्हे उपडकीस आणले आहेत. ओंकार राजेश मोरे (वय १९ रा. रामनगर, पेरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर शुभम जांभूळकर असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि. २६ जून) गुन्हे शाखा युनिट ६  चे पथक पेट्रोलिंग करताना पोना रमेश मेमाणे, व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, यांना वाहन व वाहनातून बॅटरी चोरी करणारा आरोपी वाघोलीतील चोखादानी रोडवर थांबला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार युनिट ६ च्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले असता त्याने साथीदारासोबत वाहन चोरीचे चार गुन्हे व वाहनातील बॅटरी चोरीचे सात गुन्हे (१४ नग) असे एकूण अकरा गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

हडपसर, लोणावळा, शिक्रापूर, पाथर्डी, वानवडी, निगडी, खडकवासला, सिंहगड रोड, चाकण पोलीस स्टेशनमध्ये त्याचेवर गुन्हे दाखल असून पुढील तपासासाठी हडपसर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल शेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, पोलीस नाईक रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, प्रमोद मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी केलेली आहे.