हडपसर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत साने गुरुजी विद्या मंदिराचे 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. विद्यार्थ्यांनी विद्या मंदिराच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत विद्या मंदिराचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले.
चि .अश्विन बाठे या विद्यार्थ्यांनी 276 गुण मिळवून राज्यात पाचवा व जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला . तर गणित विषयात100/100 प्राप्त केले
कु . सिया बारटक्के या विद्यार्थिनीने 268 गुण मिळवत राज्यात नववा व जिल्हयात सहावा क्रमांक पटकावला .
या दोघांबरोबरच 19 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित करून यश मिळवले .यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये
सोहम उगलमोगले, सार्थक जाधवर , सोहम जायभाये, जय आचार्य , देवश्री करंजकर, त्रिशा डोंबाळे , निहारिका लाळगे, जानवी वलवे, गौरी बनकर,ईश्वरी माने, ज्ञानेश्वरी ढाकणे , आभा गोवंडे, अनुष्का खेडेकर, शार्दुल बाबर, संस्कृती टिळेकर , पल्लवी क-हाळे,अर्णव गंधट , वैष्णवी दिवेकर व अवंतिका गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .
संस्थेचे सचिव अनिल गुजर सहसचिव अरुण गुजर व मुख्याध्यापक सुरेश गुजर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या व अपार श्रम घेणाऱ्या कुंजीर सोनाली, सौ सुनिता कारंडे व सौ माया जरांडे या मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक केले.