पुणे

मुंबई दादर जंक्शन मध्ये बॉम्ब आहे अशी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीला लोणीकाळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे 

पुणे: लोणी काळभोर, दि.17 : मुंबई येथील दादर  रेल्वे स्टेशन मध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशी खोटी माहीती देऊन प्रशासनाची झोप उडवून लोकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या व विनाकारण अफवा पसरविणाऱ्या एका तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी काल टोलनाक्याजवळील हॉटेल जयश्री परिसरातून  ताब्यात घेतले. 

 

योगेश शिवाजी ढेरे (रा. घर नं ११९३ गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीनी मंदीर जवळ जनवाडी, पुणे) असे अटक करण्यात  आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत सुतार व योगेश पाटील हे पेट्रोलिंग करत असताना टोलनाक्याजवळील हॉटेल जयश्री परिसरात कॉलर थांबला आहे, त्यामळे पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कळवून सदरील ठिकाणी जाऊन चौकशी केली असता आरोपी हाँटेल च्या बाहेरील बाजूस दिसून आला असता त्याला लगेंच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये त्याची फिर्याद दिली.

 

तत्पूर्वी हॉटेल जयश्री येथील कामगारांकडे आरोपी मुलाकडे असणारा मोबाईल क्रमांक दाखवून चौकशी केली असता सदर मोबाईल नंबर हा योगेश ढेरे याचा असल्याचे पोलिसांना समजले. हॉटेल जयश्री च्या परिसरात योगेश ढेरे याचा शोध घेतला असता तो हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला दिसला . त्याच्याकडे सदर कॉलच्या प्रकरणी चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे मोबाईल मिळून आला. दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांमध्ये घबराट निर्माण होवून पळापळ होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवीतहानी व्हावी या उद्देशाने पोलीसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे त्याच्यावर दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.