पुणे

हवेली महसूल नायब तहसीलदार पदी सचिन आखाडे तर निवडणुक नायब तहसीलदार पदी संजय जोशी यांची नियुक्ती

प्रतिनिधी -स्वप्नील कदम 

हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदारपदी सचिन सुरेश आखाडे, तर निवडणूक नायब तहसीलदारपदी संजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवेली तहसील कार्यालयाच्या महसूल नायब तहसीलदार पदाचा पदभार सचिन आखाडे यांनी सोमवारी (ता.३१) स्वीकारला आहे. 

सचिन आखाडे यांनी सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत दौंड येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून शासकीय कामकाज पहिले आहे. तर २०२१ ते २०२३ या कालावधी चंदगड (जि. कोल्हापूर) येथे निवडणूक नायब तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आखाडे यांनी या पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या हाताळून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

 

दरम्यान, सचिन आखाडे यांची चंदगड निवडणूक तहसीलदार पदावरून हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीचे आदेश महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी शुक्रवारी (ता. २८ जुलै) दिले होते. त्यानंतर सचिन आखाडे यांनी सोमवार (ता. ३१) पासून हवेलीच्या महसूलच्या नायब तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारून शासकीय कामकाजाला सुरवात केली आहे.

याबाबत बोलताना हवेलीचे महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे म्हणाले कि, हवेलीतील सातबारातील झालेल्या चुकांची दुरुस्ती ऑनलाईनमधील चुक दुरुस्तीची कामे, आरटीएस टेबल संबंधीत प्रलंबित प्रकरणे निर्गत करण्यासाठी भर दिला जाणार आहे. तसेच हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर महसूलच्या कामाचा निपटारा लवकर करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे.