पुणे

“साडेसतरानळी जलवाहिनीच्या परवानगीसाठी शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीला, “अवघ्या सात तासात निर्णय, आयुक्तांकडून तत्काळ 50 लाखाचा निधी…

हडपसर ( रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज )
हडपसर चे आमदार शरद पवार गटात की अजित पवार गटात हा संभ्रम कायम असताना आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हडपसर मधील साडेसतरानळी येथील रखडलेला पाणीप्रश्न निकाली काढला, मतदार संघातील प्रश्नासाठी अजितदादांची भेट घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले, अवघ्या सात तासात साडे सतरा नळी जलवाहिनीसाठी परवानगी मिळाल्याने अजितदादाच्या कामाचा झपाटा पुन्हा एकदा समोर आला आहे.
साडेसतरानळी आणि परिसराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाचे आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्याची तक्रार हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या भेटीनंतर आमदार तटस्थ असतानाही पवार यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली त्यामुळे काही तासातच महापालिकेला जलसंपदा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले त्यामुळे येत्या काही दिवसात साडेसतरानळीचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

साडेसतरानळी आणि परिसराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे मात्र त्यासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे गेल्या चार महिन्यांपासून हरकत प्रमाणपत्रासाठी जलसंपदा विभागाला निवेदने देण्यात येत होती निविदा प्रक्रियेनुसार काम करण्याचा कालावधी संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले असल्याने काम पूर्ण होणे अपेक्षित होते त्यामुळे ही बाब साडेसतराळी येथील ग्रामस्थांनी आमदार तुपे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानुसार तुपे यांनी शिष्ट मंडळासह पवार यांची भेट घेतली अवघ्या काही मीटर अंतराच्या कामासाठी न हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याचे तक्रार शिष्टमंडळाने केल्यानंतर पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आणि सायंकाळी ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला मिळाले.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही तत्काळ या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
त्यामुळे साडेसतरानळी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान आमदार म्हणून पवार यांची भेट घेतली ही भेट राजकीय नव्हती साडेसतरानळीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ही भेट होती असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
आमदार चेतन तुपे यांच्या समवेत शिष्ट मंडळात हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे माजी उपसभापती संदीप तुपे, माजी उपसरपंच रुपेश तुपे, हडपसरचे कार्याध्यक्ष संदीप बधे, संजय लोणकर आदी उपस्थित होते.

 

सकाळी ११ वाजता अजितदादांनी फोन केला व अवघ्या ७ तासांच्या आत मध्ये पाटबंधारे विभागाने पुणे मनपा ला काम करण्यास परवानगी दिली. तसेच पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांना गावांतील लाईन डिस्ट्रीबुट करण्यासाठी निधी वर्गीकरण करून देण्यात यावा असे सांगितले व त्यासाठी दादांनी त्यांचे पीए विकास पाटील यांना आमदार चेतन तुपे पाटील यांच्यासह विक्रम कुमार साहेबांची भेट घेण्यासाठी पाठवले व आयुक्तांनी तात्काळ ५० लाखांचा निधी दिला तसेच आगामी काळात पाणीपुरवठ्या साठी निधीची कमतरता होणार नाही याची ग्वाही दिली. पुणे मनपा च्या अधिकारी व कंत्राटदार यांनी लवकरात लवकर उर्वरित काम पुर्ण करून गावचा पाणी प्रश्न मार्गी लावावा. समस्त ग्रामस्थ साडेसतरानळी करांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार.
रूपेश दत्तात्रय तुपे
मा. उपसरपंच – साडेसतरानळी