पुणेमहाराष्ट्र

आखाती देशात महिलांची विक्री करणाऱ्या दलालास अखेर पोलिसाच्या हाती ;मुंबईच्या माहीम मधून केली अटक…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी आखाती देशात महिल्यांची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या महिलांची सुटका करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी दलालाला मुंबईच्या माहीम मधून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील काही महिलांना मध्य आशिया आणि आखाती देशांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवत त्यांची या देशात विक्री करण्यात आल्याची धक्काडायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या काही महिलांसह आणखी चौघींचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. या महिलांची सुटका करण्यात आली होती. तसेच आरोपी दलालावर गुन्हा देखील करण्यात आला होता. या फरार दलाला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या माहीम परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मोहम्मद फैय्याज अहमद याहया (वय 28, रा. ओशिवरा. मूळ रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील तीन महिलांची प्रत्येकी चार लाख रुपयांमध्ये आरोपीने विक्री केली होती. या प्रकरणात दोन महिलांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नसरीन भाभी, अब्दुल शेख, शमिमा खान आणि हकीम या आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान फरार दलालाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतील माहिममधून अटक केली आहे. मोहम्मद फैय्याज अहमद (वय 28, रा. ओशिवरा. मूळ रा. कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या इतर फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

पीडित महिला मार्केटयार्ड परिसरात राहायला आहेत. या महिलांना चंदननगर येथील एका महिलेने आखाती देशात जादा पगाराचे आमिष दाखवले होते. या आमिषाला या महिला बळी पडल्या. त्यांना सफाई कामगार म्हणून टुरिस्ट व्हिसावर सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका अरबाकडे त्यांनी पाठविले. या दलालांनी महिलांची 4 लाख रुपयांत विकले होते. या महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याने त्यांनी पुण्यात संपर्क साधत त्यांच्यावर बेटलेल्या प्रसंगाची माहिती दिली. यानंतर तातडीने पावले उचलून त्यांची सुटका करून त्यांना पुन्हा पुण्यात आणले होते.

याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हा मुंबईत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी पथक तयार करत सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलिस अंमलदार तुषार भिवकर, अमित जमदाडे हे मुंबईला रवाना झाले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपी याह्या याला सापळा रचून अटक केली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, अमित जमदाडे, मनिषा पुकाळे यांच्यासह पथकाने केली.