उंड्री ः विवाहित पुरुषांच्या आत्महत्या वाढत आहेत. न्यायालयामध्ये वैवाहिक समस्येची लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. तणाव आणि नैराश्येमुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, पुरुषांकडून नोकऱ्या आणि करिअर बरबाद होत आहे. खोटे खटले, वैवाहिक समस्यांचा परिणाम पुरुषांवर होत आहे, असे मत एसआयएफएफ संस्थेचे सहसंस्थापक राजेश वखारिया यांनी व्यक्त केले.
सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरुषदिनानिमित्त 50 पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन साजरा करीत पोलिसांचा सन्मान केला. याप्रसंगी अनिल मूर्ती, समीर गोयल, जयदत्त शर्मा, सागर गुंठाळ उपस्थित होते.
गुंठाळ म्हणाले की, न्यायालयाने पुरुष आणि स्त्रियांना समान वागणूक द्यावी, महिलांना सहानुभूती द्यावी, लग्नाच्या कालावधीच्या आधारावर देखभाल आणि पोटगीचा निर्णय घ्यावा, प्रतिबंध करम्यासाठी न्यायालयाने मानसशास्त्रज्ञ आणि मनोचिकित्सक नियुक्त केले पाहिजेत, त्यामुळे खटल्यांचा सामना करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य स्थिर राहिल. देशातील वाढत्या आत्महत्या प्रश्नासाठी विशेष आयोग नियुक्त केला पाहिजे, राजीकय पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात कौटुंबिक कारणामुळे झालेल्या आत्महत्येचा मुद्दा समाविष्ट करणे आवश्यक आहे. लैंगिक भेदभावापासून संरक्षण करण्यासाठी सुविधानात सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.