सेवानिवृत्ती नंतरही स्वतःला कार्यमग्न ठेवणारे सत्तरीच्या उभंरठ्यावरील तरुण पाहून अतिशय आनंद होत आहे प्रतिपादन किर्लोस्कर न्युमेटिकचे माजी व्यवस्थापकीय संचालक हरी मुस्तीकर यांनी केले.
विष्णू जी की रसोई येथे किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ७२ जेष्ठ नागरिक उपस्थित होते. पंचाहत्तरी पार केलेले सुमारे पंचवीस तरुणांचा, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेष्ठांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी संयोजक अजित निरगुडकर यांचा ७५वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी हरी मुस्तीकर यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमोद देशपांडे, मेनन, नवनाथ झांजुर्णे, विलास बाबर, श्रीशैल्य जकुणे, विठ्ठल घाटे, विलास देशमुख, अनिल गुजराथी, दिलीप नायडू, राजन जोशी, मनिषा जावडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
आपण सेवानिवृत्ती नंतरही विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने सर्वच तंदुरुस्त आहेत याचा अभिमान वाटतो असे निरगुडकर म्हणाले. यानंतर स्नेहभोजनाचा लाभ घेतला.
या मेळाव्याचे नियोजन अजित निरगुडकर, विलास बाबर, सुधीर मेथेकर आणि मुकुंद शालुकर आदींनी केले.