पुणेमहाराष्ट्र

अट्टल वाहनचोरट्यांना अटक करीत सात गुन्हे उघड कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी ः

पुणे,  ः पाच ठिकाणची पाच वाहने अट्टल वाहनचोरट्यांना अटक केली. सौरभ व्यंकटराव मोरे (वय २३, रा. वाघदरी, ता. देवणी, जि. लातूर) आणि सूर्यप्रताप गंधर्वसिंग कुशवाह (वय २३, रा. बासगड, तहसील करेरा, जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपीनी ५ ठिकाणची वाहने चोरून सात गुन्हे केल्याचे उघडकीस आणण्याची दमदार कामगिरी कोंढवा पोलिसांनी केली.

 

पोलिसांनी सांगितले की, कोंढव्यातील बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आजीचा ढाबा हॉटेलसमोर दोन दुचाकीविक्री करण्यासाठी दोन संशयित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडून तपास केला असता सौरभ मोरे यांने सूर्यप्रताप कुशवाहच्या मदतीने पाच ठिकाणी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींवर कोंढवा-२, चाकण-१, म्हाळुंगे-३ आणि सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एक असे एकूण सात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतीष चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.