पुणे (प्रतिनिधी )
लोककल्याणा साठी जे धाडस लागते ते फार क्वचित लोकात असते. समाजाला ज्याची गरज आहे ते ओळखुन ते देण हे राजाभाऊ होले व त्यांचे प्रतिष्ठाण करीत आहे.असे मत तुकाई दर्शन फुरसुंगी येथे लोककल्याण प्रतिष्ठाण तर्फे राजाभाऊ होले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन लोककल्याण अन्नपुर्णा योजना शुभारंभ व लोककल्याण साधना गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी कैकाडी महाराजांचे तीसरे वंशज किरण महाराज जाधव बोलत होते.यावेळी व्यासपिठावर मा.प.स.सदस्य शंकर हरपळे,मा.नगरसेवक मारुती तुपे,लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले,कार्याध्यक्ष हरीश्चंद्र कुलकर्णी,उपाध्यक्ष दिलीप भामे,प्रा.एस.टी.पवार,संजय देशमुख,पांडुरंग शेंडे,सुहास खुटवड,दत्तात्रय राऊत,शिवसेना प्रवक्त्या विद्या होडे,छाया दरगुडे आदी उपस्थित होते.
लोककल्याण अन्नपुर्णा योजनेच्या १७ व्या लाभार्थी श्रीमती राणी मुदकवी यांना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत दरमहा किराणा वाटप शुभारंभ व विविध क्षेत्रात कार्यरत नवरत्न राष्ट्र साधना-पो.नि.उल्हास कदम,समाज-रमेश निवंगुणे,उद्योग-विशाल कामठे,ज्ञान-तुकाराम ससाणे,धर्म-निखील दरेकर,क्रिडा-जितेंद्र साळुंखे,सहकार-भारत बिडवे,पत्रकारिता-दिगंबर माने,मातृ-पितृ गौरव-श्री व सौ.जया लक्ष्मण कोल्हे यांना किरण महाराज जाधव यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पुरस्काराचे हे १४ वे वर्ष होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाजा समोर आणुन त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक कार्य करण्याची उर्मी मिळावी.तसेच विधवा महिलेला काडीचा आधार देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले यावेळी म्हणाले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना मा.प.स.सदस्य शंकर हरपळे म्हणाले,समाजात काही लोकांकडे पैसा भरपुर आहे पण दानत नाही.सत्कार्य कसे करावे हे राजाभाऊ होले व त्यांच्या प्रतिष्ठान कडुन शिकण्यासारखे,गिरवण्यासारखे आहे.याप्रसंगी शिवसेना प्रवक्त्या विद्या होडे,मा.नगरसेवक मारुती तुपे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा शेंडे,प्रास्ताविक दिलीप भामे,मानपत्र वाचन प्रा.एस.टी.पवार तर आभार हरीश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले.