पुणे, दि. २२ ः शिवाजीनगर न्यायालयात पेशीकरिता आणल्यानंतर पळून गेलेल्या मोक्कातील आरोपीला बेड्या ठोकल्या. राजेश रावसाहेब कांबळे (वय ३७, रा. गोसावीवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शिवाजीनगर न्यायालयातील सुनावणीनंतर येरवडा कारागृहाकडे नेत असताना पोलीसांच्या ताब्यात पळून गेला होता. तांत्रिक तपासामध्ये आरोपी केज, बीड येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतिबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने ही दामदार कामगिरी केली.