पुणे (प्रतिनिधी )
हडपसर मध्ये सतत व्हीआयपी दौरा होत असताना राज्यपालांच्या आज दौऱ्यात पोलिसांनी वाहनचालकांची अडवणूक केल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, व्हीआयपी दौरे रोज होणार मग सर्वसामान्यांना याचा त्रास का असा सवाल वाहनचालक व नागरिक करीत आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर लोणी एमआयटी कॉलेजमध्ये राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा होता पुणे सोलापूर महामार्गावर व्हीआयपी मोमेंट सांगून चौका चौकात पोलीस वाहनचालकांची व नागरिकांची अडवणूक करत होते 15 नंबर मांजरी फाटा चौकात क्रॉस असताना विनाकारण पोलीस रवीदर्शन चौकात पाठवीत होते त्यामुळे रवीदर्शन चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती, व्हीआयपी मोमेन्ट नावाखाली व व्हीआयपी दौऱ्याचे कारण सांगून सामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास का असा सवाल नागरिक करत होते अर्जंट हॉस्पिटलची महत्त्वाची कामे आहेत असे सांगून सुद्धा पोलीस 15 नंबर चौकात वाहन चालकांना विनाकारण रवीदर्शन चौकात पाठवले जात होते, राज्यपालांचा ताफा यायला वेळ असताना वाहन चालकांची कुचंबना का केली जात आहे? पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी आहे की नागरिकांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत होते.
मांजरी फाटा चौकात हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस बंदोबस्तासाठी होते पोलीस कर्मचारी अडवणूक करत होतेच परंतु वीआयपी मोमेंट सांगून हडपसरचे पोलीस अधिकारी देखील वाहनचालकांना दमदाटी करत होते.
आपण भरलेल्या टॅक्स मधून शासनाचे प्रतिनिधी व्हीआयपी सुविधा घेतात व त्यांच्या दौऱ्यावर वाहन चालक व नागरिकांच्या अडवणूक करून नागरिकांचीच अडवणूक केली जाते हा त्रास नागरिकांना अजून किती दिवस सहन करावा लागणार आहे?
राज्यपाल ताफा गेला अन बंदोबस्तवरील पोलीस गायब..
व्हिआयपी ताफा येणार म्हणून सामान्य वाहनचालकांची अडवणूक करून दमदाटी करणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी राज्यपालांचा ताफा गेल्यावर मात्र तातडीने पसार झाले झालेल्या वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता पोलिसांच्या या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये चर्चा पसरली आहे.