पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशातील राजकीय वातावरण अतिशय खालच्या पातळीला गेले आहे. भाजपाकडून देशात तसेच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचे अतिशय वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. पुण्यातील वातावरणही फार मोठया प्रमाणात ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत वैयक्तिक लक्ष घालावे, असे साकडे खुद्द शरद पवार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समक्ष भेट घेत घातले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हे नाव आणि ‘पक्ष चिन्ह’ अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचा नामफलक तोडला होता. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.त्यामुळे तेथील वातावरण तंग झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत वैयक्तिक लक्ष घालावे, असे साकडे खुद्द शरद पवार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समक्ष भेट घेत घातले.
पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला. त्यानंतर पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर काळया फिती बांधुन निषेध व्यक्त करण्यात आला होता.
“गली गली मे शोर है अजित पवार चोर है, जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा”, अशा घोषणा दिल्या. तर पक्ष कार्यालयाबाहेर असलेल्या कोनशिलेवरील अजित पवार यांचे नाव हातोडी मारून फोडण्यात आले. या घटनेनंतर अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी प्रशांत जगताप यांना जाब विचारला, त्यामुळे काही काळ पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पक्ष कार्यालय परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीनंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत.एकंदरीत या घटनेमुळे पुण्याचे वातावरण चांगलेच तापले असून शरद पवार गटाचे कार्यकर्ते दडपणाखाली असल्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शिवाजीनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन पवार यांच्याकडे तक्रार दिली.