पुणेहडपसर

साधनाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश

हडपसर,वार्ताहर. केंद्र शासनाच्या
निती आयोग, व लर्निग लिंक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट 2023” ही राष्ट्रीय पातळीवरील अटल टिंकरिग लॅब (ATL) मधील विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा व प्रोजेक्ट प्रदर्शन बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर ,बंगळूर येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील एकूण 100 प्रोजेक्ट्स मधून साधना विद्यालय, हडपसरच्या अटल टिंकरिंग लॅब मधील प्रणव भाटगावे, तेजस गायकवाड या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फार्मर हेल्पींग रोबोट या प्रोजेक्टची पहिल्या पाच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून निवड झाली.

 

या विद्यार्थ्यांना अटल इनोवेशन मिशन,निती आयोग भारत सरकार चे संचालक डाॅ. चिंतन वैष्णव यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे चे अटल टिंकरिंग लॅब समन्वयक मुराद तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतनदादा तुपे पाटील ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार , विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत ,आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.