हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे पेपरच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्यांना सुखद अनुभव आला. बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा तणाव दूर व्हावा आणि परीक्षेची सुरुवात आत्मविश्वासाने व्हावी यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितलले.
अण्णासाहेब मगर कनिष्ठ महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा केंद्र क्रमांक ५१ असून अण्णासाहेब मगर महाविद्यालयात, के. के. घुले विद्यालय मांजरी, सोनई इंग्लिश मिडीयम स्कुल, भेकराई माता विद्यालय, न्यू इंग्लिश स्कुल फुरसुंगी या शाळांतील १४७४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, उपप्राचार्य प्रा. विलास शिंदे, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. जयश्री अकोलकर, प्रा. शकील तांबोळी प्रा. कैलास देशमुख, प्रा. सागर भराटे, प्रा. शीतल कापरे, प्रा. अनिल दाहोत्रे उपस्थित होते.