चांगली कविता कागदावर असेल आणि सादरीकरण योग्य नसेल तर आपणच आपली कविता मारतोय. त्यासाठी प्रत्येकांनी कवितचे पाठांतर करून सादरीकरण केल्यास ती कविता रसिकांच्या मनाला भावते. असे मत प्रमुख पाहुणे गझलकार विजय वडवेराव यांनी यावेळी व्यक्त केले.
साहित्य सम्राटचे १८१ वे कविसंमेलन लोहिया उद्यान हडपसर येथे पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समितीच्या साहित्यिक कट्ट्यावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी आयोजित केले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुणे मराठी ग्रंथालयाच्या संचालक सौ माधुरी चिद्दरवर होत्या. यावेळी नावीन्य पूर्ण हिंदी, मराठी गझल आणि कविता सादर करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ कवी किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, सुधाकर झिंगाडे, वि. रा. मिश्रा, खलील शेख, राहुल भोसले, शिवाजी जाधव, प्रतिभा मगर, विजय माने, प्रीती आबनावे, ज्ञानेश्वर नखाते, सुषमा रणदिवे आणि अर्चना अष्टुळ यांनी आपल्या बहारदार कवितांनी रसिकांची मने जिंकली. कविसंमेनाचे सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर प्रा.अशोक शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.