पुणेमहाराष्ट्र

मुंढवा – केशवनगर चौकातील भुयारी मार्गासाठी पाच कोटींची तरतूद शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या लढ्याला यश

पुणे (प्रतिनिधी )

प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, इंधनाचा अपव्यव, प्रचंड मनस्ताप हा रोजच्या अनुभव मुंढवा केशवनगर चौकात वाहन चालकांना अनुभवायला भेटत आहे, नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुणे महापालिकेला दखल घेणे भाग पडले.
मुंढवा – केशवनगर चौकात भुयारी मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.

मुंढवा – केशवनगर चौकात सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक प्रचंड हैराण झाले होते, तासनतास वाहनांच्या रांगा लागत असल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यव होतो, येथील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी 15 डिसेंबर रास्ता रोको आंदोलन केले व प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला, अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला असताना राजकारण्यांनी व प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, भानगिरे यांनी तातडीने आंदोलन केल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी येथील भुयारी मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली.

उपनगर झपाट्याने वाढत असताना पालिकेत समाविष्ट नव्या गावांचे नागरी प्रश्न प्रलंबित आहेत, महापालिकेत प्रशासक असल्याने सर्व नगरसेवक माजी झाले आहेत, त्यामुळे दाद कोणाकडे मागायची परंतु राजकीय साठमारी बाजूला ठेऊन नाना भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

मुंढवा – केशवनगर वाहतूककोंडी प्रश्न सुटणार…
मुंढवा – केशवनगर येथील रस्ते, वाहतूक, असे अनेक प्रश्न रखडल्याने नागरिकांना यातना सहन कराव्या लागत होत्या, त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनाची दखल घेऊन पाच कोटी निधी भुयारी मार्गासाठी तरतूद झाले आहेत, त्याबद्दल महापालिका आयुक्त व प्रशासनाचे मनपूर्वक आभार.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख – शिवसेना पुणे