गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारने खरंतर जनतेसमोर विकासाचा पाढा वाचायला हवा. मात्र दहा वर्षे सत्ता उपभोगूनही विकासाची पाटी कोणीच असल्याने भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मते मागण्यासाठी पुणे शहर रंगवून विद्रूप करण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही. भारतीय जनता पार्टीच्या या मतांच्या राजकारणात सुंदर पुणे शहर मात्र पक्षाच्या घोषणांनी रंगवून विद्रुप केले जात आहे. पुणे शहराच्या या विदृपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्र मंडळ चौक पर्वती येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. दहा वर्षात देशावर वाढलेला कर्जाचा बोजा, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भारतातून बाहेर गेलेले उद्योगधंदे, महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, ढिसाळ निर्यात धोरणाने बळीराजाचे झालेले नुकसान अशा सर्वच बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मत मागायला लाज वाटते म्हणून भारतीय जनता पार्टीने “दिवार लेखन” अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले.