पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिलाय. खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
मागील काही महिन्यांपासून अतुल देशमुख भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अश्यातच सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतुल देशमुखांना काम करावं लागणार होतं. आणि हेच न पटल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत हातात तुतारी घेतली.
मागच्या निवडणुकीत खेड आळंदी मतदारसंघात देशमुखांनी आपली मोठी ताकद दाखबून दिली होती. त्याचबरोबर भाजपच्या वाढीसाठीही मोठी मेहनत घेतली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये वाट्याला येत असलेला अपमान आणि खेड तालुक्यात सुरु असलेल दडपशाहीचे राजकारण याला वाचा फोडण्यासाठी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेतली. मोहितेंच्या दडपशाही विरोधात हा पक्ष प्रवेश करत असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याने आता शिरुर मधून अमोल कोल्हे यांचा विजय सुकर झालाय. अतुल देशमुखांनी तुतारी हातात शरदचंद्र पवार प्रवेश केल्याने दिलीप मोहिते यांच्यासह अजित पवारांना चांगलाच शह बसलाय.
दरम्यान अतुल देशमुख यांसह पुणे शहर कार्यालयात खेडचे अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, जवळपास ३५ ते ४० सरपंच उपस्थित आहेत त्याचबरोबर आळंदीचे अनेक माजी नगरसेवक, खेड व चाकणचे अनेक माजी नगरसेवक सोबत असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी सुधीर भोमाळे, मनोहर सांडभोर, राहुल आडारी, संतोष सांडभोर, चेतन बर्गे, केतन लगड, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब शिंदे, अनंता भागीर, दत्ता कवडे, बारकू आवळे, कैलास चिखले, गणेश साबळे, सुनील काळोखे, विनोद लोहोट, गणेश लोहट, उमेश वर्पे, आदित्य गुंडरे, संजय मोहिते, दत्ता परदेशी, किरण येळवंडे, बाळासाहेब कहानी, पंडित गोडसे, प्रकाश बांगर, रघुनाथ लांडगे, संदीप दसगुडे, शिवाजी कड, मंगेश गुंडाळ, मनोहर सांडभोर, सचिन सातकर, बापू दौंडकर, अक्षय केदारी, राहुल पिंगळे, धीरज आदक, योगेश धायबर, निलेश पवार, आयुष जाधव, मंदार क्षीरसागर, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.