पुणे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे अभिवादन, जयंती निमित्त दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन

माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क बहाल करणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने पुणे शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे व पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच, आलेल्या आंबेडकरी अनुयायांना चहा व पाणीवाटप केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील वानवडी येथे संविधान चौकात खा.अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप व माजी आमदार महादेव बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. येतील सम्राट अशोक बोधी विहार येथेही डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डेंगळे पुलाजवळील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सालाबाद प्रमाणे पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामूहिक अभिवादन करण्यात आले.

 

चौकट: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचा श्वास आहे. मनुवादी शक्तीकडून संविधानाला वारंवार नख लावण्याचा प्रयत्न होत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या संविधानाचे व लोकशाहीचे रक्षण करणे हीच आपल्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उचित अभिवादन ठरेल.
— प्रशांत सुदामराव जगताप