पुणे

“यंदा दाखवतोच तू निवडून कसा येतो? अजित पवारांचा अहंकार मतदारांच्या पायदळी… “बारामती व शिरूरचा निकाल पालकमंत्र्यांसाठी आत्मपरीक्षण करणारा…विशेष वार्तापत्र”

पुणे (अनिल मोरे)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फटाफट झाल्यानंतर बारामती व शिरूर ची जागा अजित पवारांनी हट्टाने लढवली, निधीवरून व विधानसभा निवडणूक वरून पदाधिकाऱ्यांना धमकी देण्याबरोबरच यंदा तू निवडून येतोच कसा? ही वापरलेली भाषा मतदारांच्या पचनी पडलेला नाही, साम-दाम-दंड-भेद सर्व शक्ती वापरूनही दोन्ही लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाला यश मिळाले अन अजित पवार यांचा अहंकार मतदारांनी पायदळी तुडवला.
लोकसभा निवडणुकीत अपयश तर आलेच परंतु आता आमदार सोडून जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची वेळ दादांवर आली आहे, बारामतीचे काका मात्र या निवडणुकीत चांगलेच भारी पडले आहेत.

 

भाजपच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून एक खासदार व 40 पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांनी घेऊन जाऊन भाजपच्या दावणीला बांधले, शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष व चिन्हे काढून घेतले भाजपच्या मदतीने सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला, मुख्यमंत्री पदाचे गाजर अजित दादांना दिल्याचे प्रसिद्धीमाध्यमात चांगलीच चर्चा झाली परंतु प्रत्यक्षात त्यांना अर्थमंत्री व पालकमंत्री पद देऊन बोळवण केली, बारामती मध्ये अजित पवार यांना उमेदवार द्यायला सांगून शरद पवारांना त्यांच्या होमपिचवर अडकवून ठेवायचे महाराष्ट्रात फिरू द्यायचे नाही हा भाजपचा डाव होता, परंतु पवार साहेब म्हणजे राजकारणातील कसलेला वस्ताद दहा लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीमध्ये लढवून तब्बल आठ उमेदवार निवडून आणले महाराष्ट्रात आधी चार होते आता आठ झाले, साहेबांचा हा स्ट्राईक रेट देशाच्या राजकारणात त्यांचे वजन वाढविणारा ठरला.
देशात चर्चा झाली बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघाची बारामती मधून अजित दादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा पवार यांना उभे केले, राजकारणाचा गंध नसलेल्या सुनेत्राताई नाईलाजाने निवडणुकीत उभा राहिल्या, अजित दादा बरोबर गेलेले आमदार, महिला पदाधिकारी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर चांगले तोंडसुख घेतले, बारामती व शिरूर या दोन्ही मतदारसंघाची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली, दोन्ही मतदारसंघात सभा घेऊन जर उमेदवार निवडून आणले नाही तर निधी देणार नाही अर्थ मंत्रालयाची तिजोरी माझ्याकडे आहे शरद पवार यांच्यासोबत गेलेले शिरूरचे आमदार अशोक पवार नगरचे आमदार निलेश लंके व डॉ.अमोल कोल्हे यांना यंदा तू निवडून येतोच कसा ते मी बघतो अशी धमकी जाहीरपणे दिली, यातील दोन जण खासदार झाले अजित दादांचं हे वक्तव्य मतदारांच्या पचनी पडले नाही, त्यातच दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, बारामती, खडकवासला मतदारसंघातून भाजपच्या व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित दादांना ठेंगा दाखविला अशी चर्चा आहे. विजय शिवतारे यांच्याशी झालेली हातमिळवणी दाखवण्यापुरतीच होती हे सिद्ध झाले.

 

पाच जागा, एक घटक पक्षाला, तटकरेंमुळे अब्रू वाचली….
महायुती जागा वाटपामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला पाच जागा दिल्या त्यातील परभणीची जागा पुन्हा काढून घेतली व रासप चे महादेव जानकर यांना दिली चार जागा लढवल्या त्यामधील शिरूर, बारामती दीड लाखाच्या फरकाने तर धाराशिव ची जागा साडेतीन लाखाच्या फरकाने गमावण्याची वेळ दादांवर आली. पक्ष काढून घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले दादा यांच्या पक्षाची केवळ एकच रायगडची जागा सुनील तटकरे यांच्या रूपात निवडून आली ते पण तटकरे यांच्या स्वकर्तृत्वावरच त्यामुळे दादांना एक हाती सत्ता दिली असे उपहासाने बोलले जात आहे.

 

“सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे यांचे कर्तृत्व झाले सिद्ध…
बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेचे केले असताना स्वतः शरद पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार व पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी नवे चिन्ह असताना प्रचारात आघाडी घेतली, पाच पैकी चार आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेले असताना डॉ.अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांना घेऊन किल्ला लढविला अन सुळे व कोल्हे दोघेही सुमारे दीड लाखांच्या फरकाने निवडून आले. निष्ठा व सहानुभूती फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला.

“आमदार वाचवण्याची दादांवर आली वेळ…
अजितदादा भाजपबरोबर सत्तेत सामील झाले अनेक आमदारांना हा निर्णय पटला नसला तरी अर्थमंत्री व पालकमंत्री झाल्याने त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात निधी मिळेल कामे मार्गी लागतील या हेतूने अनेक आमदारांनी साहेबांना सोडले, परंतु आता लोकसभेत मानहानीकारक पराभव झाल्याने आमदारकी धोक्यात आल्याचे चित्र लक्षात घेऊन काही आमदार पुन्हा शरद पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अडचणीच्या काळात पवार साहेबांना सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा तो सन्मान मिळणार का? व अजितदादा या आमदारांना रोखणार का? ते येणारा काळ ठरवेल.

“पवारांचा करिष्मा अन राज्याच्या राजकारणात नवे नेतृत्व…
शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीच्या असताना डॉ.अमोल कोल्हे यांनी राज्यात इतर उमेदवारांसाठी सभा घेतल्या, याचा फायदा माढा, अहमदनगर, बारामती, बीड येथील उमेदवारांना झाला तसेच आमदार रोहित पवार यांनी पायाला भिंगरी बांधून राज्यभर दौरे केले, अजित पवार पक्ष सोडून गेलेल्या असताना शरद पवारांच्या करिष्मामुळे नव्यांना संधी मिळून रोहित पवार,अमोल कोल्हे सारखे नवे नेतृत्व राज्यात तयार झाले.