हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
बांधकाम व्यावसायिकाकडून विकसन करताना फसवणूक झाली त्यातच आयुष्यभराची पुंजी अडकली न्याय मिळावा व बांधकाम व्यवसायिकावर कारवाई व्हावी म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारल्या मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबी फक्त टोलवाटोलवीच आली, एका पत्रकाराने तक्रार केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारायला सांगितले, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक्यांमध्ये तक्रारदारांची हेळसांड होत असताना नव्या “कारभाऱ्यांना” मात्र पोलीस कर्मचाऱ्यांवर अंकुश बसवण्यास अपयश आले आहे.
लोकसंख्या वाढल्यामुळे जवळजवळ तीन पोलीस स्टेशनचा कारभार असलेल्या हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दिवसभरात मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येतात, कामाचा ताण असल्याचे कारण सांगून तक्रारदारांना चकरा मारायला लावल्या जातात, हद्दीचा वाद न सांगता तक्रारदारांची तक्रार घ्यावी असे आदेश असताना तीन ज्येष्ठ नागरिकांना मांजरी, हडपसर अशा चकरा मारण्याची वेळ आली, दोन महिने उलटूनही या ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रार अर्जाची दखल पोलिसांकडून घेतली गेली नाही.
एका वरिष्ठ पत्रकारांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांसमोरच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तक्रार केल्यावर अधिकाऱ्यांनी पोलिसांना अर्ज घेण्यास सांगितले अधिकाऱ्यांच्या आदेशानेच पोलीस वागत असतील व सामान्य नागरिकांना काडीची किंमत देत नसतील तर पुणे शहरातील उपनगरातील पोलीस ठाण्यात स्मार्ट पोलिसिंग सुरू आहे का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
पाश्चिमात्य देशाच्या धर्तीवर राज्यातील पोलीस नवनव्या आधुनिक यंत्रणांचा वापर करत असताना प्रत्यक्षात हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना मात्र स्मार्ट पोलीसिंग दिसत नाही तर तक्रार करणाऱ्या फिर्यादींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जात आहे, गुन्हेगारी व अवैध धंद्यात खूप पुढे असलेल्या हडपसर मध्ये “खमक्या” अधिकाऱ्याची गरज आहे, सध्याच्या “कारभाऱ्यांना” पोलीस कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश येत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे.
जेष्ठ नागरिक फसवणूक नेमके काय आहे प्रकरण?
तीन ज्येष्ठ नागरिकांनी मांजरी येथे सर्वे नंबर 127 मध्ये तीन गुंठे 19 फूट जागा विकत घेतली ती जागा एका बांधकाम व्यवसायिकाला विकसित करण्यासाठी दिली त्या व्यवसायिकांनी दुसऱ्या चार जणांना तीन विकसित करण्यासाठी दिली अर्धवट बांधकाम करून या व्यवसायिकांनी ती इमारत भाड्याने दिली आहे, ठरल्याप्रमाणे लिफ्ट, वीज मीटर, मेन गेट व आतील कामे अपूर्ण आहेत, रजिस्टर कराराप्रमाणे मुदतीत बांधकाम तयार केले नाही बांधकाम व्यवसाय करणे स्वतःच्या सदनिका तयार करून भाड्याने दिल्या सिंगल फेज मीटरवर सब मीटर बसवले आहेत मूळ मालकास न कळविता काही सदनिका परस्पर विकल्या व काही भाड्याने दिल्या आहेत चार ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये फसवणूक झाली आहे.
सिसिटीव्ही कॅमेरे बंद, पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहणार का?
हडपसर परिसरात महापुरुषांच्या पुतळ्यास दगड मारून वातावरण संतप्त झालेले असताना, सीसीटीव्ही फुटेज असूनही आरोपी पकडण्यास दोन दिवस लागले, त्यातच येथे महापालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्याचे इनपुट तुकाई टेकडी येथील पोलीस चौकीमध्ये दिलेले आहे मात्र येथील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलीस प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे याचा प्रत्यय येत आहे, धडाकेबाज पोलीस आयुक्त म्हणून ज्या अमितेश कुमार यांचा उल्लेख केला जातो, त्यांनी हडपसर व उपनगर परिसरात गुन्हेगारी, अवेध्य व्यवसाय आणि पोलिसांकडून तक्रारदारांची होणारी हेळसांड याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.