पुणे

“अमली पदार्थांचे सेवन करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अवैध पब, बार व लाउंजवर कारवाईचा बडगा उगारा, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची प्रशासनाकडे मागणी…

काहीच दिवसांपूर्वी फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाउंज या पबमध्ये काही तरुणांकडून अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या अमली पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देणाऱ्या अवैध्य पब बार व लाउंज वर तात्काळ कारवाईचा बडगा उभारण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच उत्पादन शुल्क विभागाला केली आहे.

प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की, पुण्यातील या अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा समूह मोहम्मदवाडी व मगरपट्टा (दुसरी शाखा) हडपसर येथे असलेल्या ‘द कल्ट’ या पब मध्ये पार्टी केल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या पबमध्ये अमली पदार्थ सेवन करण्यासाठी आला असल्याचे ठळकपणे समोर आले आहे व तेथील घटनेचा व्हिडिओ समोर आला. तरी कल्याणीनगर पोर्शे प्रकरणापासूनच शहरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या पब व बारवर कायमची बंदी घालण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने पत्राद्वारे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, यांना केली होती ज्यावर काही ठिकाणी कारवाई देखील झाल्याचे दिसून आले. परंतु लिक्विड लीजर लाउंज येथे घडलेल्या प्रकरणानंतर अद्यापही काही पब व बार रात्री उशीरापर्यंत चालू राहत असल्याचे आढळून येत आहे आणि एवढेच नाही तर बेभानपणे तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे सेवन अशा पब व बारमध्ये होत आहे.

 

पुणे शहरातील बेकायदेशीररीत्या रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पब व बारवर त्वरित कायमची बंदी घालण्यात यावी व ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या या सुशिक्षित पण अजाण, असंवेदनशील तरुण पिढीला वेळीच धडा शिकवून पुणे शहराच्या संस्कृतीवर काळिमा फासणाऱ्या कृत्यांवर लवकरात लवकर आळा घालण्यात यावा व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी प्रमोद भानगिरे
शहरप्रमुख – शिवसेना पुणे