पुणेमहाराष्ट्र

मुंढवा रेल्वे स्टेशन, महंमदवाडी ते रामटेकडी दोन डीपी रस्त्यांचा मार्ग मोकळा खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

हडपसर – मुंढवा रेल्वे स्टेशन परिसरातील अनुक्रमे १२ मी. आणि २४ मी. तसेच महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील ३० मी व १८ मी. डीपी रस्त्यांच्या कामांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

हडपसर परिसरातील नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील डीपी रस्त्यांची कामे केल्यास पर्यायी रस्त्यांची उपलब्धता होऊन वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल, त्या हडपसर परिसरातील डीपी रस्त्यांची कामे करण्याच्या मागणीचा खासदार डॉ. कोल्ह यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार पुणे महापालिकेने पीपीपी तत्वावर या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंढवा रेल्वे स्टेशन परिसरातील स.नं.६४,६६,६७, ६८ व ७१ मधील १२ मीटर आणि २४ मीटर डीपी रस्त्यांच्या कामांची रु. ५३ कोटी ९० लक्ष रकमेची आणि महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट स.नं. ४० ते ७६ मधील ३० मीटर व १८ मीटर डीपी रस्त्यांच्या कामांची रु. ६४ कोटी १२ लक्ष रकमेच्या कामांना सुरुवात होणार आहे .

मुंढवा रेल्वे स्टेशन परिसर आणि महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकेल सदरील कामें सुरू झाले याचा मला आनंद होत आहे यातुन हडपसर परिसरातील मिसिंग लिंक च्या कामांना गती मिळेल व त्याच बरोबर नवीन डेव्हलपमेंट होऊन परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल याचा मला आत्या आनंद आहे असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.