पुणेहडपसर

साधना विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा.

हडपसर,वार्ताहर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थी,शिक्षक,पालक व समाजामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती , शिक्षण विषयक जनजागृती व्हावी यासाठी
दि. 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालय व मा.उपसंचालक पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले होते.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते व माधुरी राऊत यांनी केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालक व समाजाचाही सहभाग घेण्यात आला. हा शिक्षण सप्ताह पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केली.

 

या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस,क्रीडा दिन,सांस्कृतिक दिवस,कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,मिशन लाईफच्या दृष्टिकोनातून इकोक्लब ,वृक्षारोपण उपक्रम व शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस व तिथीभोजन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.