पुणेमहाराष्ट्रहडपसर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला नॅक पिअर टीमचे अध्यक्ष म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. लोकनाथ, समन्वयक सदस्य विद्यापीठ केरळचे कुलगुरू प्रा. डॉ. के. सी. बैजू , शिलॉंग येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चंदना भट्टाचार्जी, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी केले.

नॅक पिअर टीमचे अध्यक्ष म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. के. लोकनाथ यांनी अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक या महान कर्तृत्ववान अशा व्यक्तिमत्त्वांना मी अभिवादन करतो. या क्षणांचे मला साक्षीदार होता आले याचा मला आनंद झाला असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी महाविद्यालयात महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा आयोजित करून त्याच्या विचार व कार्याचा जागर करत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. लतेश निकम डॉ. रमाकांत जोशी, डॉ. रवींद्र मेने, डॉ. नाना झगडे, डॉ. शुभांगी शिंदे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे, धनंजय बागडे, विद्या खराडे, वैशाली कोरडे, सूर्यकांत घोरपडे, चांगदेव पोमन, नारायण खोमणे, शिवाजी सोनवणे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.