पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी प्रास्ताविक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालयशास्त्राचा पाया घातला. ग्रथालय हे वाचककेंद्री बनवण्यासाठी त्यांनी ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री सांगितली. प्रत्येक ग्रंथाला वाचक आणि प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळावा अशी त्यांची भूमिका होती. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केल्याचे सांगितले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रवीण ससाणे, डॉ. नाना झगडे, डॉ. राजेश रसाळ, डॉ. शरद गिरमकर, डॉ. आकाश निंबाळकर, पवन कर्डक आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.