देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले. स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडावे, देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्रशांत जगताप यांनी उपस्थितांना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी आमदार श्री. जयदेव गायकवाड़, श्री.अंकुश काकडे, श्री. रवींद्र माळवदकर, भगवानराव सालुंखे,डॉ.सुनील जगताप, सौ.स्वाती पोकळे, श्रीकांत पाटील तथा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.