पुणेहडपसर

विश्व मानवाधिकार संस्थेच्या वतीने अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे ः प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्ट (विश्व मानवधिकार संस्था)च्या वतीने दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे यांना मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी चेअरमन डॉ. एच.आर. रेहमान व सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या वतीने बहाल करून सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. गणेश राऊत आणि दै. पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन बालगुडे यांना गौरविण्यात आले. यावेळी दै. पुण्यनगरीतील उपसंपादक सागर जाधव आणि सर्व सहकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. गणेश राऊत यांनी बालगुडे यांना पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. बालगुडे यांनी बांधकाम क्षेत्राला प्रसिद्धी माध्यमाचं योगदान याविषयावर ३५० पानांचा प्रबंध सादर केला आहे. तसेच, मागिल ४० वर्षांहून अधिक काळ सामान्यांसाठी निस्वार्थीपणे सेवा करीत आहेत. समाजातील अडलेल्या नडलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची समाजसेवा ही त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी ठरत आहे, असे डॉ. गणेश राऊत यांनी सांगितले.