पुणे

“माझ्यावर गुन्हे दाखल करा, पण कार्यकर्त्याला धक्का लावू नका, माजी महापौरांचा पवित्रा अन हडपसरमध्ये रंगली चर्चा

पुणे (प्रतिनिधी)
हडपसर मध्ये दहीहंडीचा थरार सुरु होता, मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अचानक पोलीसांनी स्पीकर बंद केला अन खटला भरण्यासंदर्भात कारवाई सूरु केली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आले होते, कार्यकर्त्यांनी विनंती केली अन जगताप यांनी पोलिसांना माझ्यावर गुन्हे दाखल करा पण कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका असे पोलिसांना सांगितल्यावर पोलीसांनी देखील सहकार्य केले अन दहीहंडी उत्सव पुन्हा सूरु झाला, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा या घडलेल्या प्रकाराची हडपसर मध्ये चांगलीच चर्चा रंगली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी उन्नतीनगर येथे दहीहंडीचे आयोजन केले होते. महिला व युवकांची मोठी गर्दी झाली होती, यावेळी अचानक पोलीस दाखल झाले अन नियमभंग केल्याचे सांगत खटला कारवाई सुरु केली, यांचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कार्यक्रमास भेट देण्यास आले होते, दत्ताभाऊ खवळे व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली अन जगताप थेट पोलिसांना भिडले, साहेब नियमभंग झाला असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा पण कार्यकर्त्यांना त्रास देऊन कार्यक्रम बंद करु नका अशी विनंती केली, यावेळी पोलिसांनी लेजर लाईट बंद करण्यास सांगितले तातडीने कार्यकर्त्यांनी ते बंद केले पोलिसांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिसांनी कारवाई टाळली जगताप यांच्या तत्परतेची हडपसर मध्ये चांगलीच चर्चा रंगली.

 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे…
आगामी हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून माजी महापौर प्रशांत जगताप हडपसर मधून इच्छुक आहेत, त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे, त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडीत शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली मात्र आघाडी घटक म्हणून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम जगताप करत असल्याने हडपसर मध्ये त्यांचा जनाधार वाढत चालला आहे.