पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात माजी विद्यार्थी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यशोगाथा ‘स्टोरीज ऑफ सक्सेस’ (Stories of Success) या पुस्तकाचे वितरण माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. सुरेशआण्णा घुले, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करतात यावे म्हणून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा व स्मरणिका प्रकाशित करणार आहे. असे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे मूल्यमापन करताना नॅक ही संस्था माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दिलेले योगदान विचारात घेत असते. यशोगाथा ‘स्टोरीज ऑफ सक्सेस’ (Stories of Success) या पुस्तकात एकशे एकोणसत्तर माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा समावेश असून यात आजी-माजी नगरसेवक, समाजकार्य करणारे कार्यकर्ते शास्त्रज्ञ संशोधक, उद्योजक, प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, पोलीस आणि सैन्यदलातील अधिकारी, कायदेतज्ञ, खेळाडू इत्यादींचा समावेश असून दिवंगत हरी नरके, सीए मच्छिद्र कामठे यांच्यादेखील यशोगाथा संपादित केल्या असल्याचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.
या प्रसंगी प्राचार्य महादेव वाल्हेर,ॲड. प्रभाकर शेवाळे कृष्णकांत कोबल, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. नितीन लगड, रवींद्र हरपळे, हेमंत मोरे, अरुण झांबरे, सुरेखा शिखरे यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गंगाधर सातव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किरण रणदिवे यांनी केले तर आभार डॉ.उज्वला खिस्ती यांनी मानले.