पुणे

“उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल अण्णासाहेब मगर महाविद्यालयात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार चेतन तुपे यांचा सत्कार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते आमदार चेतन तुपे पाटील यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.’

 

दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या कॅम्पसची पहाणी केली. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडांगणाची त्यांनी पहाणी केली. या वेळी हँडबॉल स्पर्धेत नैपुण्य मिळविलेल्या खेळाडूंचा त्यांच्या हस्ते सत्कार केला. तसेच त्यांनी स्व. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

या प्रसंगी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश अण्णा घुले, हडपसर रा.कॉ. अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, हडपसर रा.कॉ. कार्याध्यक्ष अमर तुपे, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. वा.पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर स्टडीजचे संचालक सचिन भारद्वाज, लॉ कॉलेजच्या प्राचार्य रागिणी पाटील, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत मुळे यांनी केले.