(पुणे)- पुण्यनगरीचे गणेशोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे उत्सवात साकारण्यात येणारे देखावे.पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील शिवसेना भवनात या वर्षी एकतानगरीचा विघ्नहर्ता हा देखावा साकारण्यात आला आहे.
या वेळी जूलै महिन्याचा अखेरीस शहरात उद्भवलेल्या, पुरस्थितीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी येथे मोठा महापूर आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती त्यावेळी शिवसेना पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदतीचा देखावा उभा करण्यात आला आहे.
जनतेचे मुख्यमंत्री ही ओळख असलेले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठाणे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी युद्ध पातळीवर राबवलेली स्वच्छता मोहीम, लष्कराच्या मदतीने केलेले बचाव कार्य, शिवसेनेकडून त्यावेळी पुरग्रस्तांना देण्यात आलेली अन्नधान्याची मदत ,प्रशासनाबरोबर केलेले सहकार्य, तसेच जनतेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याशी संवाद साधत महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली एकतानगरीतील युरो किडस् ही शाळा शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी पुन्हा नव्याने उभी केलेली शाळा ही यात दाखवलेली आहे.
राज्याचे विद्यमान लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जनतेसाठी किती संवेदनशीलतेने काम करतात. प्रसंगी कारच्या टपावर चढून नागरिकांनी संवाद साधतात. पुराच्यावेळी आपत्ती व्यवस्थापन दलांनी ,लष्कराने कशी मदत केली, हे यात दाखवण्यात आले आहे.
देशातील महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख म्हणून कसा असावा,याचा वस्तूपाठ इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नामदार एकनाथजी शिंदे यांनी कश्या प्रकारे घालून दिला आहे हेच या देखाव्यातून मांडण्यात आले आहे. हा देखावा बघण्यासाठी आणि शिवसेना भवनातील राजाच्या महाआरतीला पुणेकर नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले आहे.