पुणेमहाराष्ट्रहडपसर

आर्थिक वादातून मित्राच्या वडिलांचे अपहरण करून ६० लाखांची खंडणी मागितलेल्या आरोपीचां अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे ( हडपसर) – फिल्मी स्टाइलने आरोपींनी भरदिवसा अपहरण केले.
पुणे सोलापूर रोड हडपसर येथील भाजी मार्केट परिसरात रहदारीच्या ठिकाणावरून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी अपहरण करून साठ लाखांची खंडणी मगितली.याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे दिनेश काशिनाथ थारेवाल यांनी फिर्याद दिली होती.

 

या प्रकरणी आरोपी तुषार संजय म्हस्के ,ऋषिकेश बाळू म्हस्के, स्वप्निल मच्छिंद्र साळवे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पुणे विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी मुळ फिर्यादी तर्फे अॅड .धनंजय काळभोर, अॅड. आदेश चव्हाण, अॅड. सुलेमान शेख यांनी आरोपी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. यावेळी मुळ फिर्यादी यांचे वकील यांनी “ज्या ठिकाणावरून अपहरण केले गेले होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी हे दिसत असून त्यांनी फिर्यादी यांना बळजबरीने गाडीमध्ये ओढुन मारहाण करून ६० लाख रुपये खंडणी मागितली व ६० लाख न दिल्यास तुमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आरोपी यांनी दिली़. अद्याप आरोपी फरार असून तपास होणे गरजेचे आहे , तसेच आरोपी यांच्या सोबत आणखी किती साथीदार आहेत याचा तपास होणे गरजेचे आहे व त्यासाठी आरोपी यांना पोलीस कोठडी मध्ये तपास करणे गरजेचे आहे असा युक्तिवाद करण्यात आला.

 

मा. विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे साहेब यांनी आरोपी यांचे वकील, सरकारी वकील श्री.प्रदीप गेहलोत , व मूळ फिर्यादी यांचे वकील अॅड. धनंजय काळभोर यांचा युक्तिवाद ऐकून सरकारी वकील व मूळ फिर्यादी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी यांचा जामीन अर्ज फेटाळला.