पुणे

“हडपसर मतदारसंघातील पाच नगरसेवक अजित पवारांची सोडणार साथ, आनंद आलकुंटे भरणार अपक्ष अर्ज, विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढणार, महाविकासआघाडीला फायदा

पुणे : राज्यात होऊ घातलेले विधानसभा निवडणुकींचे बिगूल अखेर वाजले आहे. त्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. अशातच पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत.

अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही बोलले जात आहे.

विद्यमान आमदाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार – आनंद अलकुंटे यांचा दावा
आनंद अलकुंटे हे माजी नगरसेवक असून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी पीएमपीएलचे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात आनंद अलकुंटे निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. हडपसर मधून अजित पवार समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. तर मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातून चेतन तुपे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे, पाच नगरसेवक ऐन निवडणुकीच्या धामधूम मध्ये पक्ष सोडून चालल्याने अजित पवारांचा उमेदवार अडचणीत आला आहे.

हडपसर मतदारसंघ जागावाटपात शरद पवारांच्या पक्षाला…
हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाकडून प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महादेव बाबर, काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर, इम्रान शेख इच्छुक आहेत, हा मतदारसंघ शरद पवार यांच्या पक्षाला मिळणार असून प्रशांत जगताप यांची उमेदवारी फायनल समजली जात आहे.