पुणे

गॅस वितरण एजेन्सी, हडपसर येथे मतदान जनजागृती – निवडणूक आयोगाचा हडपसरमध्ये उपक्रम

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी समिधा गॅस सर्विस, हडपसर येथे गॅस एजन्सी कर्मचारी, ग्राहक व नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर घरोघरी जाऊन गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ग्राहकांना मतदानाचे आवाहन करण्यास सांगितले. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, रोहित अजनळकर, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, एजेन्सी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.