पुणे

विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान केंद्र बदलाबाबत जनजागृती…

२१३ हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुक २०२४ करिता एकूण ५३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार केंद्र सुसुत्रीकरणांतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघातील खुल्या जागेत तात्पुरत्या पत्राशेड मधील १४७ मतदान केंद्रांचे पक्क्या इमारतीतील खोल्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्र बदलाबाबत नागरिकांना माहिती मिळण्यासाठी 213 हडपसर स्वीप टीम तर्फे स्टिकर, बॅनर तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे ,जेणे करून मतदारापर्यंत ही माहिती मतदानपूर्वी पोहोच होईल. बदल झालेल्या केंद्राचा तपशील voter helpline App व https://electroalsearch.eci.gov.in या साईटवर know your polling station यामध्ये पाहता येईल. तसेच स्टिकर व बॅनर वर दिलेला QR कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून ठिकाणात बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशील सविस्तर तपशील उपलब्ध करून घेता येईल. अशी माहिती मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री डॉ. स्वप्नील मोरे यांनी आज रोजी तुपे सभागृह, हडपसर ,पुणे येथे दिली.

यावेळी जिल्हा समन्व्यक अधिकारी श्री महेश सुधळकर, मा. तहसीलदार श्री नागनाथ भोसले, तहसीलदार श्रीमती शैलजा पाटील मॅडम, नायब तहसीलदार श्रीमती जाई कोंडे, श्री हनुमंत खलाटे, श्री हेमंत घोलप, श्री सचिन खडके, श्री विजय घुमटकर, श्री नितीन तुपे, श्री संग्राम पवार, श्री शैलेश शिंदे, श्री संतोष गायकवाड, श्री गणेश देशमुख,श्री रवी ऐवळे, श्री पद्माजी डोलारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन 213 हडपसर स्वीप टीम तर्फे समन्वयक श्री अमरदीप मगदूम, सहाय्यक श्री संजीव परदेशी, श्री प्रशांत कोळेकर, श्री पंकज पालकुडतेवार, श्री प्रद्युम्न गिरी, श्री नितेश मकवाना यांनी केले.