पुणेमहाराष्ट्रहडपसर

सात राजकीय पक्ष व संघटननेने दिलेल्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे विजयाचा टक्का वाढला….

महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या बाजूने काम करणारी आरक्षणवादी आघाडी संघटनेने पाठिंब्याने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवाराची धाबे दणाणले….

राजकीय पक्षाच्या उमेदवारावरती विश्वास ठेवू नका अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांनाच निवडून द्या – आरक्षणवादी आघाडीचे राज्याचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे

हडपसर ( प्रतिनिधी ) :- हडपसर विधानसभा मतदारसंघातील सात राजकीय पक्ष व संघटना मिळून एकत्र आलेली ” आरक्षणवादी आघाडी ” व धनगर संघटनेचा वतीने अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने मतदारसंघातील वातावरण बदलण्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील आरक्षणवादी आघाडी या पक्षीय व सामाजिक संघटनेच्या प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी गंगाधर बधे यांना पत्र देऊन पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे त्यासोबत संघटनेमध्ये असलेले सर्व सभासद नागरिक मतदार यांना गंगाधर बधे यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

 

हडपसर मतदार संघात प्रचाराची यंत्रणा अंतिम टप्प्यात असल्याने राजकीय उमेदवारांना कंटाळून मतदारसंघातील प्रत्येक समाजातील नागरिक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देताना दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांना वाढता प्रतिसाद पाहून , ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, जनहित लोकशाही पार्टी, लोकराज्य पार्टी, ओबीसी एनटी पार्टी, मुस्लिम सेवा संघ या सर्व पक्षांची व संघटनांची आरक्षणवादी आघाडी च्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघातील गंगाधर बधे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. एवढ्या मोठ्या संघटनेने व छोट्या-छोट्या पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे गंगाधर बधे यांच्या विजयाच्या शर्यतीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे धनगर समाजाचे महाराष्ट्राचे युवा नेते घनश्याम बापू हाके यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार गंगाधर बधे मध्ये यांना जाहीर पाठिंबा देऊन संपूर्ण धनगर समाजाने पाठिंबा दिला असल्याचे हाके यांनी जाहीर केले आहे. हडपसर मतदार संघामध्ये प्रकाश अण्णा शेडगे व घनश्याम बापू हाके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हडपसर मतदार संघातील पारंपारिक राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाला कंटाळून शेंडगे आणि हाके यांनी अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्याकरिता कंबर कसली आहे.

राज्याचे आरक्षणवादी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले, हडपसर विधानसभा मतदारसंघातील तीनही राजकीय पक्षाचे नेत्यांनी विकास केला नाही, केवळ आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली आहे. मागील पंचवीस वर्षापासून मतदार संघामध्ये तेच प्रश्न समोर येत आहेत, तेच प्रश्न सोडवणार असे आश्वासन देऊन मतदारांना पुन्हा दिशाभूल करत आहे. मतदार आता जागा झाला असून त्यांनी पारंपारिक राजकीय पक्षांना मतदान न करता अपक्ष उमेदवार गंगाधर बधे विजय करावा. ही संधी चुकली तर पुन्हा आपल्या वाटेला त्याच समस्या येणार आहेत.