पुणे

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपदी प्रणिता लालासाहेब भोईटे राजे निंबाळकर यांची नियुक्ती

पुणे (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपदी प्रणिता भोईटे राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यकक्षा मोनिका हरगुडे यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड झाली.
प्रणिता भोईटेराजे निंबाळकर या स्वामिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असून महिला संघटन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे, त्या मुळच्या बारामती वडगाव निंबाळकर येथील राजे निंबाळकर कुटुंबातील असून शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड त्यांना आहे. त्यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश आण्णा घुले, मोनिका हरगुडे, दिलीप वाल्हेकर यांनी अभिनंदन केले आहे.