नागपूर/ प्रतिनीधी: ( विलास गुरव) मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरण प्रकल्पाला तब्बल ६ वर्षे उलटूनही अद्याप प्रकल्प अपूर्ण आहे. मे २०१८ मध्ये सुरु झालेल्या हायटेक बसस्थानकाच्या बांधकामाचे आजपर्यंत केवळ ८ इंच बांधकाम झाले आहे.
या प्रलंबित प्रकल्पामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना हलाखीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. सध्या बसस्थानकाचा कारभार एका पत्र्याच्या शेडखाली चालवला जात असून, त्याठिकाणी उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही. स्वच्छता, पेयजल, व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असून प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
प्रलंबित प्रश्न;
१) चिपळूण बसस्थानक नूतनीकरणाचा प्रकल्प ६ वर्षांपासून रखडलेला आहे.
२)चिपळूण व संगमेश्वर आगारात बसेसची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. मागणी करण्यात आलेली खालीलप्रमाणे;
१)चिपळूण बसस्थानक नूतनीकरणाचा प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
२) राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन बसेसमधून काही बसेस रत्नागिरी विभाग, विशेषतः चिपळूण व संगमेश्वर आगारासाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात.
चिपळूण बसस्थानकाच्या अपूर्ण प्रकल्पामुळे कोकणातील प्रवाशांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बसफेऱ्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ही परिस्थिती तातडीने सुधारण्याची अपेक्षा आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बसस्थानकाचा नूतनीकरण प्रकल्प त्वरित पूर्ण करावा आणि ग्रामीण भागासाठी आवश्यक बसेस उपलब्ध करून प्रवाशांना दिलासा द्यावा. यामुळे जनतेचा शासनावरचा विश्वास वाढेल आणि मतदारसंघातील विकासाला चालना मिळेल.