पुणे

मुंबई दादर येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण सभागृह येथे आमदार शेखर निकम यांचा मुंबईस्थित चाकरमान्यांसाठी संवाद भेट कार्यक्रम हजारोंच्या जनसमुदायात संपन्न

मुंबई/ प्रतिनिधी: [ विलास गुरव] दादर येथील मुंबईस्थित चाकरमान्याशी संवाद साधनाता आमदार शेखर निकम बोलत असता ही निवडणूक सोपी नव्हती. अनेकमुंबई अडचणींना मला सामोरे जावे लागले. माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. त्या शिवाय धनशक्तीचाही मोठा जोर होता. परंतू तुम्ही सर्वांनी ज्या ताकदीने मला सपोर्ट केला, माझ्या साठी धावून आलात त्यामुळेच विजयी आमदार होण्याचे भाग्य मला लाभले, अशी प्रांजळ कबुली देताना चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले तेव्हा उपस्थित शेकडो चाकरमान्यांनी ‘आमदार शेखर निकम यांचा विजय असो’ अशी घोषणा देत सभागृह द‌णाणून सोडले.

 

मुंबई-दादर येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण सभागृह येथे आज रविवारी आ.निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर मधील मुंबईस्थित चाकरमान्यांसाठी संवाद भेट कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते, त्यावेळी मंचकावर चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, मुंबई येथील राजेंद्र सूर्वे, श्री. शंकर माटे, श्री. घडशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोतमाना आ. निकम म्हणाले की, यापुढे तुमच्यासोबतचा संवाद मर्यादीत राहणार नाही. मी दर मंगळवारी मुंबईत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मंत्रालयासमोरील पक्षाच्या कार्यालयात आपली भेट होऊ शकते. त्याशिवाय मुंबईच्या ज्या-ज्या भागात चिपळूण- संगमेश्वरचे चाकरमानी वास्तव्यास वास्तव्यास आहेत, त्या-त्या ठिकाणी त्यांची भेट घेण्याचा मी प्रयत्न करेन. त्याद्वारे तुमच्या गावातील प्रश्न, अडी-अडचणी, समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

ते पुढे म्हणाले की, पुढील पाच वर्षे मतदारसंघात अतिशय चांगले काम करण्याचा आपला मानस आहे. पर्यटन, कृषी, शैक्षणिक, व्यापार, वैद्यकीय आदि क्षेत्राशी निगडीत विकास कामे पूर्ण करण्यावर भर राहील. शासनाची प्रत्येक योजना मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाईल. तुम्ही सर्वांनी निवडणूकीत प्रचंड मेहनत घेतली. तुमच्यामुळेच माझा विजय शक्य झाला. तुम्हा सर्वांच्याप्रति ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे आ. निकम यांनी सांगताच उपस्थित चाकरमान्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.

रविवार असूनही या कार्यक्रमाला चाकरमान्यांची तोबा गर्दी झाली होती. मुंबईच्या विविध भागातून हे चाकरम‌ानी आले होते. आ. निकम यांनी प्रसन्न मुद्रने सर्वांचे स्वागत स्वीकारले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कदम यांनी केले.