पुणे (प्रतिनिधी) ह.भ.प .सौ.वैशाली ताई धनंजय खोले.म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मी सध्या श्री समर्थ विद्यापीठ सज्जनगड सातारा संचलित , समर्थ बोध परीक्षा देत आहे .त्या परीक्षेच्या समिक्षक म्हणून सौ,वैशाली ताई यांचे अमूल्य आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळते आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय झाला,सर्वानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा, असे वाटते.या उद्देशाने त्यांचा थोडासा परिचय येथे देत आहे.
सौ,वैशालीताई धनंजय खोले या बी.कॉम., डी.टी.एल.,एम.ए.बी.एड.असुंन नाशिक योग विद्या धाम या विद्यापीठाच्या योग प्रवेश, योग परिचय परीक्षा उत्तीर्ण आहेत.श्री समर्थ विद्यापीठ सज्जनगड, सातारा,या विद्यापीठाच्या समर्थ बोध,साधक,आणि प्राज्ञ तसेच मनोबोध विशारद परीक्षा,विशेष प्राविण्यासहित उत्तीर्ण आहेत आणि त्या गेल्या पाच वर्षापासून श्री समर्थ विद्यापीठासाठी मान्यता प्राप्त मार्गदर्शक म्हणून त्या कार्यरत आहेत.*कलापिनी संस्था तळेगाव आयोजित नाट्य वाचन स्पर्धेत सलग चार वेळेस बक्षिसे मिळाली आहेत.पूना ब्लाइंड स्कूल साठी एका वर्षी स्वतःच्या आवाजात Recording करून दिले आहे.
वात्सल्य **या मतिमंद मुलांच्या शाळेत सलग तीन वर्षे सेवा कार्य केले आहे.आकाशवाणी संभाजी नगर येथे सात वर्षे निवेदिका म्हणून कार्य केले आहे. सेंट लॉरेन्स मराठी शाळा ,संभाजी नगर ,येथे तीन वर्ष शिक्षक आणि एक वर्ष मुख्याध्यापक म्हणून अध्यापन कार्य केले आहे. निगडी,पुणे येथे श्री चॅनल(केबल नेटवर्क) यामध्ये वृत्त निवेदिका म्हणून कार्य केलेले आहे. मेजवानी परिपूर्ण किचन यामधे रेसिपी करून दाखविल्या आहेत.तसेच सुपरवुमन,तुमच्या साठी काहीपण, या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन बक्षिसे सुध्दा मिळालेली आहेत.वाचन,लेखन यांची ताईंना आवड असून वृतपत्रे मासिके यातून लेख प्रसिद्ध झालेले आहेत अनेक कार्यक्रमांचे निवेदन कार्य केले असून,अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर प्रवचन,निरूपण आणि कीर्तनसेवा दिली आहे आणि ते कार्य सातत्याने चालू आहे.., *देव माझा*या ट्यूब चॅनल माध्यमाद्वारे गेल्या दीड वर्षापासून सतत देव,धर्म ,राष्ट्र,संत साहित्य .या विषयावर प्रचार,प्रसाराचे कार्य चालू आहे. आशा या,बहु आयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या समीक्षक सौ.वैशालीताई धनंजय खोले (चिंचवड) यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. .. त्यांच्या या कार्यास वंदन… लेखन.प्रा.डी.एस. कुलकर्णी