चिपळूण/ प्रतिनीधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा प्रतोदपदी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांची नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेखर निकम यांची विधानसभेच्या प्रतोद पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. निकम यांच्या प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला मान्यता द्यावी, असे पत्र विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव यांनाही याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांची राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी नियुक्ती झाल्याने चिपळूण संगमेश्वरमधील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आमदार शेखर निकम
