पुणे दि ०८:मॉडेल कॉलनी,पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व शासनाचे इतर विभाग तसेच महानगरपालिका यांचे समन्वयाने आयोजित शासन आपले दारी या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलताना पुढे त्या म्हणाल्या की सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता म्हणुन मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनमानसात लोकप्रिय आहेत.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेचे प्रश्न संबंधित विभागांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गी लावावेत.यावेळी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थ्यांना लाभाचे आदेश वाटप, विविध दाखले वाटप, क्षयरोग पीडितांना कीट वाटप, पिंक रिक्षा लाभार्थ्यांना रिक्षा वाटप,मतदार ओळखपत्र वाटप,इत्यादी लाभ वाटप करण्यात आले.
विविध विभागांच्या सुमारे २० स्टॉल मार्फत दिवसभर जनतेकडून माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात आले.या शिबिरामध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला व एक ते दीड हजार नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व अर्ज दाखल केले.
या कार्यक्रमासाठी श्री धनंजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच तहसिलदार पुणे शहर श्री सुर्यकांत येवले ,पुणे शहर उपायुक्त श्री संकपाळ,निवडणूक नायब तहसीलदार सायली धस,आरोग्य विभाग पर्यवेक्षक श्री प्रशांत कुलकर्णी,समाज कल्याण अधिकारी रामदास चव्हाण,परिमंडळ अधिकारी श्री ओव्हाळ यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात सहभाग सी नोंदवला.या कार्यक्रमास पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह , उपशहर प्रमुख संजय डोंगरे, संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ,पुणे शहर समन्वयक संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.