पंढरपूर

“प्रत्येकाने कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करावे – रघुनाथ जाधव, विविध क्षेत्रातील दिग्गजांना “महा गौरव पुरस्कार 2025” प्रदान

पंढरपूर (प्रतिनिधी)
आपल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्याने “महा गौरव पुरस्कार 2025” सन्मान झाला, पुरस्कार हा प्रेरणा देणारा व जबाबदारी वाढविणारा असतो, प्रत्येकाने कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव यांनी व्यक्त केले.

स्वेरी कॉलेज गोपाळपूर, ता.पंढरपूर येथे संपन्न झालेला “महा गौरव पुरस्कार 2025” भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटा पार पडला. हा पुरस्कार सोहळा आपली चळवळ वृत्तपत्र समूह व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुरस्कार वितरणाच्या या सोहळ्यात पत्रकारिता, कृषी, समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, उद्योग व विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री.राहुल शिंदे (सामाजिक ), हरिदास भिसे (क्रिडा शिक्षक), अजय अदाटे (कृषी सेवा), विवेक माने (कृषी), जागृत पवार (उद्योजक), विजय खरात (उद्योजक), हरिभाऊ काळे (सामाजिक), सागर कोळी (पत्रकार), बाळासाहेब भुसनर (शिक्षक), सुरज डोके (उद्योजक), गजानन पाटील (शिक्षक), शशिकांत कोळी (पत्रकार), समाधान काकडे (उद्योजक), नागेश जाधव (कृषी) प्रसाद सातपुते ( उद्योजक ), विक्रसिंह भोसले (सामजिक), मदन चौधरी (उद्योजक), कुदळे क्लासेस पुणे हे सर्व महा गौरव पुरस्कार 2025 चे पुरस्कारार्थी ठरले.

या कार्यक्रमास डॉ.संजयकुमार भोसले साखर आयुक्त यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित मार्गदर्शन केले. यासोबतच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, पुणे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, पोलीस अधिकारी अनिल राजगुरु, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जनसेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश जवंजाळ, गायिका कोमल पाटोळे, अभिनेत्री शितल ढेकळे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर, पी पी आर चे संपादक तानाजी जाधव, अचूक निदान चे संपादक डी के साखरे, पत्रकार सावता जाधव, राजेंद्र माने आदी मान्यवरांनी सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचं आयोजन गोरक्ष विलास गायकवाड आणि टीमने केले होते.
अतिशय देखण्या सोहळ्यात पुरस्कारार्थी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.