पुणे

“शरद पवार यांची आझम पानसरे यांची घेतली भेट” “मावळची निवडणूक पवारांनी गांभीर्याने घेतली” ‘शिवसेनेला भाजप समर्थकांचा झटका’

पिंपरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपात गेलेले जेष्ठनेते आझम पानसरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. या भेटीमुळे मावळ लोकसभा मतदार संघात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेनेकडे आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. पार्थ पवार यांनी मावळमधून लढावे अशी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेत पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहिर केली. पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने पदाधीकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

आज पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शरद पवार पिंपरीमध्ये आले आहेत. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी आझम पानसरे यांची त्यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली. आझम पानसरे सध्या भाजपमध्ये आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आझम पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशावेळी भाजपने त्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, साडेचार वर्षात भाजपकडून कोणतीही आश्वासन पुर्ती न झाल्याने ते भाजपवर नाराज आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीदरम्यान राजकीय खलबतेही झाल्याचे समजते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

I knbow thіs webb page presents qualty bаsed articleѕ or reviews and other datɑ, iѕ there any other site whic
gіves these things in qualіty? https://live.maiden-world.com/wiki/Informasi_Jasa_Backlink_Murah_Berkualitas:_Perihal_Terliar_Mengenai_Jasa_Backlink_Murah_Bahkan_Enggak_Menjijikkan

1 year ago

Asking questions are really pleasant thing if you are
not understanding anything entirely, however this piece of writing gives pleasant understanding yet.

1 year ago

Wow that was odd. I just wrote an extremely long comment but
after I clicked submit my comment didn’t appear. Grrrr…
well I’m not writing all that over again. Anyway, just wanted to say wonderful blog!

1 year ago

What’s up it’s me, I am lso viiting this site on a regular basis, thius weeb
page iss actually nice and the visitors aare eally sharinhg nikce thoughts.

9 months ago

Ponieważ technologia rozwija się coraz szybciej, a telefony komórkowe są wymieniane coraz częściej, w jaki sposób tani, szybki telefon z Androidem może stać się zdalnie dostępnym aparatem?

9 months ago

Czy jest jakiś sposób na odzyskanie usuniętej historii połączeń? Osoby posiadające kopię zapasową w chmurze mogą użyć tych plików kopii zapasowych do przywrócenia zapisów połączeń telefonicznych.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x